shivjayanti top 05 quotes 2024 marathi | dialogue for editing
जय शिवराय मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण shivaji maharaj quotes marathi दिलेले आहेत shivjayanti निमित्त हे quotes दिलेले आहे
1)
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा…
2)
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले,
शौर्याने लिहिली इतिहास गाथा.
असे आमुचे शिवबाराजे.
त्यांच्या चरणी ठेवितो माथा.
3)
“ इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर…
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर…
राज्य करणारे राजे म्हणजे राजे शिवछत्रपती ’’
4)
स्त्रीयांचा आदर, शत्रूचे मर्दन…
असेच असावे. मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवरायांची शिकवण.
5)
!!प्रौढ प्रताप पुरंधर !!
!! क्षत्रिय कुलावतंस !!
!!सिंहासनाधिश्वर !!
!!महाराजाधिराज !!
!!योगीराज श्रीमंत
शिवजन्म: ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशाहा शाहजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते. शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे. विजापूरच्या आदिलशाहाने ते बेचिराख करून टाकले होते. शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर ! शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या, तेव्हा या
धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे, हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्हयातील जुन्नरजवळील किल्ला, त्याच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजीराजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलांवर चालून गेले.
.... आणि तो सोन्याचा दिवस उजाडला. फाल्गुन बढ्ध तृतीया शके १५५१ म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३०. शिवनेरीच्या नगारखान्यात सनई, चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंदीआनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव 'शिवाजी' ठेवले.